मैदानावर आहे हिटमॅन, परंतु घरी बायकोला येतो रोहितच्या ‘या’ गोष्टींचा खूप राग

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करून जगातील महान फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. रोहितच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत, ज्यांना तोडणं कोणासाठीही सोपे नाही. वनडे सामन्यात ३ द्विशतकं ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

रोहित (Rohit Sharma) त्याच्या चाहत्यांना आणि आपली पत्नी रितिका सजदेहला ( Ritika Sajdeh) लकी मानतो. स्टँडमध्ये रितिका बर्‍याचदा रोहितसाठी प्रार्थना करताना दिसत असते. रितिका आणि रोहित बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. पण रोहितच्या अशा दोन सवयी आहेत, ज्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर नाराज होते.

भारतीय संघाचा फलंदाज मयंक अगरवालने (Mayank Agrawal) रोहितला एका लाईव्ह सेशन दरम्यान सांगितले, की तुझ्या अशा दोन सवयी आहेत. ज्या रितिकाला अजिबात आवडत नाहीत.

मयंक म्हणतो, “रितिकाने सांगितलं, की ज्यावेळी ती तुझ्याशी बोलते, तेव्हा तिला वाटतं की तू तिचं बोलणं ऐकतोय. पण तुझं लक्ष दुसरीकडेच असतं.”

ही गोष्ट ऐकूण भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhavan) म्हणाला, रोहितच डोकं तर बंदच असतं. तरीही रोहितने ही तक्रार खरी असल्याचे सांगत म्हटले, “रितिका मला सांगते, की काय काय सामान संपलं आहे. पण मी म्हणतो मी मागवेल. पण जेव्हा ती संध्याकाळी यावर विचारते, तेव्हा माझ्याकडे कोणतंही उत्तर नसतं. मग मी तिला विचारतो, काय मागवायचे आहे.”

रितिकाला रोहितचं नखं कुरतडण्याची सवयीचाही खूप राग येतो. रोहितने सांगितले, मी यावर बऱ्यापैकी काम करत आहे.

रोहितने या लाईव्ह सेशन दरम्यान सांगितले, “रितिका माझी खूप काळजी करते. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्याने श्रीलंकेविरुद्ध आपलं तिसरं द्विशतक केलं होतं, तेव्हा रितिका स्टँडमध्ये रडत होती. रितिकाने रोहितला सांगितले, की जेव्हा तो द्विशतकाच्या जवळ होता आणि १९६ धावांनंतर एक धाव घेण्यासाठी उडी मारली, तेव्हा तिला वाटलं त्याचा हात मोडला. त्यामुळे रितिकाचे डोळे भरून आले होते.”

वनडे कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद न होणारा एकमेव भारतीय फलंदाज

वनडे क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त फलंदाज वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करतात. अनेक फलंदाजांनी वनडेत जबरदस्त कामगिरी करत अनेक विक्रमांची सांगड घातली आहे. यामध्ये वनडेत शून्यावर बाद होण्याच्या नकोश्या विक्रमाची देखील नोंद झाली आहे. हा विक्रम श्रीलंकाचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. तो वनडेत सर्वाधिक ३४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

तर, तब्बल १७ फलंदाजांच्या नावावर वनडेत २० किंवा २०पेक्षा जास्तवेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. तो २०वेळा वनडेत शून्यावर बाद झाला आहे.

परंतु, याउलट जर वनडे कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद न होण्याऱ्या फलंदाजांविषयी पाहायचे झाले, तर असे खूप कमी फलंदाज मिळतील.

वनेडत सर्वाधिक डाव खेळून एकदाही शून्यावर बाद न होण्याचा विक्रम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू केप्लर वेसेल्सच्या नावावर आहे. तो १०९ सामन्यातील १०५ डावात खेळून एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. वनडेत १००पेक्षा जास्त डाव खेळून एकदाही शून्यावर बाद न होणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

जर, वनडेत २०पेक्षा जास्त डावात एकदाही शून्यावर बाद न होणाऱ्या भारतीय खेळाडूंविषयी पाहायचे झाले तर, असा फक्त एक भारतीय क्रिकेटपटू आहे. तो म्हणजे यशपाल शर्मा. शर्मा यांनी त्यांच्या ७ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत ४२ सामन्यात ४० डावांत फलंदाजी केली आहे. दरम्यान त्यांनी ४ अर्धशतके करत एकूण ८८३ धावा केल्या होत्या.

१९७८मध्ये सियालकोट येथील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करणाऱ्या शर्मा यांनी १९८५ला इंग्लंडविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला. दरम्यान ते १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होते. त्यांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध ८९ धावांची खेळी केली होती. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना सामनावीर पुरस्कारदेखील मिळाला होता. शिवाय, इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत शर्मा यांनी ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

रोहित, रैना व धोनी; तिघांच्याही नावावर आहे आयपीएलमध्ये एक खास कारनामा

आयपीएल ही खाजगी क्रिकेट लीगमधील सर्वात मोठी लीग समजली जाते. जगभरातील क्रिकेटपटू यात खेळण्यासाठी प्रयत्नशील असता. आयपीएल म्हटलं की मुंबई इंडियन्स व चेन्नईच्या खेळाडूंची विशेष चर्चा होतं असते.

त्यात एमएस धोनी व रोहित शर्माची चर्चा तर विचारुच नका. याचबरोबर विराट कोहली व सुरेश रैनासारखे खेळाडूही मागे नाहीत. Raina, Rohit, Dhoni only Players to Score at least 1 Half Century in all IPL Seasons.

या लीगमध्ये एमएस धोनीने १९० सामन्यात १७० डावात फलंदाजी करताना ४२.२०च्या सरासरीने ४४३२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ अर्धशतकांचा समावेश आहे.

सुरेश रैनाने १९३ सामन्यात १८९ डावांत फलंदाजी करताना ३३.३४च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत.

यात त्याने १ शतक व ३८ अर्धशतकं केली आहेत.

तर रोहित शर्माने १८८ सामन्यात १८३ डावात फलंदाजी करताना ३१.६०च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. यात त्याने १ शतक व ३६ अर्धशतकं केली आहेत.

आयपीएलचे आजपर्यंत १२ हंगाम झाले आहेत आणि केवळ धोनी, रैना व रोहितने या बाराही हंगामात कमीतकमी एकतरी अर्धशतक केले आहे. बाकी कोणत्याही खेळाडूला हा कारनामा करता आलेला नाही

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे ५ कर्णधार

भारतात मार्च, एप्रिल व मे महिन्यात आयपीएलची चर्चा सर्वत्र असते. क्रिकेेटप्रेमी भारतीय अगदी जुन महिन्यापासूनच या लीगची वाट पाहत असता.

अगदी यात अनेक चाहते आपल्या आवडत्या संघातील खेळाडूंची आकडेवारी सांगत आपलाच संघ कसा भारी आहे हेही सांगतात. काही चाहते मिम्स बनवत वर्षभर आय़पीएल व त्यातील किस्स्यांवर चर्चा करत असतात. Most win as a Captain in IPL.

क्रिकेट जगतात अनेक क्रिकेट लीग होतात. परंतु याचमुळे आयपीएलचे एक वेगळेच महत्त्व आहे. या देशभरातून येणारे क्रिकेटपटू व प्रेक्षक यांचाही समावेश आहेच.

या लीगचे आतापर्यंत १२ हंगाम झाले आहेत. यात सर्वाधिक सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याचे भाग्य एमएस धोनीला लाभले आहे.

त्याने १७४ सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज व रायझिंग पुणे सुपरजायंटचे नेतृत्त्व केले आहे. MS Dhoni is the 1st & Only Captain to win 100 IPL Matches

या लेखात सर्वाधिक सामने जिंकून देणाऱ्या कर्णधारांची आपण माहिती करुन घेणार आहोत.

एडम गिलख्रिस्ट

एकूण सामने- ७४ , जिंकलेले सामने- ३५, पराभूत सामने- ३९, विजयी टक्केवारी- ४७.२९ टक्के

४. रोहित शर्मा

एकूण सामने- १०४ , जिंकलेले सामने- ६०, पराभूत सामने- ४२, टाय सामने- २, विजयी टक्केवारी- ५८.६५ टक्के

३. विराट कोहली

एकूण सामने- ११० , जिंकलेले सामने- ४९, पराभूत सामने- ५५, टाय सामने- २, अनिर्णित सामने- ४, विजयी टक्केवारी- ४७.१६ टक्के

२. गौतम गंभीर

एकूण सामने- १२९ , जिंकलेले सामने- ७१, पराभूत सामने- ५७, टाय सामने- १, विजयी टक्केवारी- ५५.४२ टक्के

१. एमएस धोनी

एकूण सामने- १७४, जिंकलेले सामने- १०४, पराभूत सामने- ६९, अनिर्णित सामने- १, विजयी टक्केवारी- ६०.११ टक्के

२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं

भारतीय संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पाने आता आणखी एक विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध २०१५मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

यावेळी उथप्पा म्हणाला की, तो टी२० क्रिकेटमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.

ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना उथप्पा (Robin Uthappa) म्हणाला की, “मला आता प्रतिस्पर्धी बनायचे आहे. मला चांगली कामगिरी करायची आहे. मला विश्वास आहे की माझ्याकडे एक विश्वचषक शिल्लक आहे. त्यामुळे मी प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे टी२० सारख्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळण्यावर भर देत आहे.”

“मी जेव्हा २००७-०८ या दरम्यान भारतीय संघाकडून खेळत होतो, तेव्हा मी ज्या काही धावा केल्या.

सलामीला फलंदाजी करूनच केल्या. यानंतर पुनरागमन करत मला मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी सांगितले. हे काही योग्य नव्हते,” असेही उथप्पा पुढे म्हणाला.

यावेळी तो म्हणाला की, त्याला आताही असे वाटते की, गोष्टी त्याच्या बाजूने जाऊ शकतात. तसेच तो टी२० विश्वचषक (T20 World Cup) विजेत्या भारतीय संघाचा एक भाग होऊ शकतो आणि त्याचबरोबर तो यावेळी महत्त्वाची भूमिकाही बजावू शकतो.

त्याने भारतीय संघाकडून खेळताना आतापर्यंत ४६ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २५.९४च्या सरासरीने ९३४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २४.९० च्या सरासरीने २४९ धावा केल्या आहेत.

तसेच त्याने २००७मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक आणि त्याचवर्षी आयोजित केलेल्या पहिल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

त्याला २००८मध्ये भारतीय संघातून बाहेर करण्यात आले होते. तसेच ऑक्टोबर २०११मध्ये पुनरागमन केल्यानंतर तो केवळ ८ वनडे आणि ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळला होता.

आयपीएलच्या सुरुवातीला त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bengalore) आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून चांगली फलंदाजी केली आहे. परंतु मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) ३ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज

एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
जगभरातील सर्व टी20 लीगमध्ये इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) ही सर्वात लोकप्रिय टी20 लीग आहे. या लीगमध्ये अनेक मोठ-मोठे विक्रम नव्याने बनतात आणि मोडले जातात. तसेच आयपीएलच्या इतिहासात अनेक अशा विक्रमांची नोंद आहे, ज्यांवरती विश्वास ठेवणे देखील अवघड जाते.

असाच एक अनोखा विक्रम म्हणजे आयपीएलच्या (IPL) एका मोसमात तब्बल 1000 मिनिटे फलंदाजी करणे. या विक्रमाची विशेष बाब अशी की, हा विक्रम आतापर्यंत केवळ एकच फलंदाज करू शकला आहे आणि तो एकमेव फलंदाज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे.

विराटने आयपीएलच्या 2016 या मोसमात दमदार फलंदाजी करत एकूण 973 धावा केल्या होत्या.

त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ऑरेंज कॅप (Orange Cap) आणि मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता. यावेळी विराटने संपूर्ण मोसमात तब्बल 1013 मिनिट फलंदाजी केली होती. आतापर्यंत आयपीएलच्या संपूर्ण मोसमात कोणत्याही क्रिकेटपटूने फलंदाजी केलेले ते सर्वाधिक मिनिट आहेत.

विराटने 2016च्या 9व्या आयपीएल मोसमात आरसीबीकडून खेळताना एकूण 4 शतक केले होते. यातील पहिले शतक त्याने गुजरात लायन्सविरुद्ध 63 चेंडूत पूर्ण केले होते. त्यानंतर पुणे सुपरजायन्टविरुद्ध त्याने आपले दुसरे शतक ठोकले होते. यावेळी त्याने 58 चेंडूत 108 धावा केल्या होत्या.

तर, तिसरे शतक 55 चेंडूत 109 धावा करत पुन्हा गुजरातविरुद्ध केले होते. तसेच, 9व्या मोसमातील आपले शेवटचे आणि चौथे शतक विराटने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) करत सामना खिशात घातला होता.

एवढेच नव्हे तर, विराट हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 5412 धावा केलेल्या आहेत.

जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती

जागतिक क्रिकेटमध्ये टी२०च्या रुपात मर्यादीत क्रिकेटचे केवळ साडेतीन तासांचे सामने सुरु झाले. २००५साली पहिल्यांदा या प्रकारातील आंतरराष्ट्रीय सामना झाला व त्यानंतर या क्रिकेटच्या लोकप्रियतेने दिवसेंदिवस उंचचउंच शिखर गाठली.

इंग्लंडमध्ये २००३मध्ये टी२० ब्लास्ट नावाची लीग सुरु झाली होती. ही जगातील पहिली व्यावसायिक क्रिकेट लीग म्हणून नावारुपाला आली. यानंतर २००८मध्ये भारतीय क्रिकेट संघटना अर्थातच बीसीसीआयने खाजगी लीगला प्रारंभ केला.

त्यानंतर जवळपास सर्वच देशांनी आपल्या खाजगी क्रिकेट लीगची सुरुवात केली. या लेखात आपण या क्रिकेट लीगबद्दल जाणुन घेणार आहोत. (7 Richest T20 Cricket Leagues in the World.)

१)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League- IPL)

बीसीसीआयची ही व्यावसायिक क्रिकेट लीग २००८मध्ये सुरु झाली. आजपर्यंत या लीगचे एकूण १२ हंगाम झाले आहेत. या लीगमध्ये सध्या ८ संघ सहभागी होतात. यात देशातील तसेच परदेशातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. ही लीग जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. मार्च ते मे महिन्यांच्या दरम्यान ही लीग खेळवली जाते. सरासरी ३५ हजार लोक आयपीएलचा प्रत्येक सामन्याला हजेरी लावतात. एका हंगामात अंदाजे ३५ लाख लोक या लीगचा आनंद प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन घेतात.

या लीगची ब्रॅंड व्यॅल्यु २०१८मध्ये ६.३ बिलीयन डाॅलर होती. तब्बल ८० कोटी रुपये हे प्रत्येक आयपीएल संघ आपल्या खेळाडूंना मानधनापोटी देतो. याचमुळे जवळपास ६९० कोटी रुपये दरवर्षी खेळाडूंच्या मानधनावर खर्च होतात. १६ हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीला बीसीसीआयने ५ वर्षांचे प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स इंडियाला विकले आहेत.

२)

बीग बॅश लीग (Big Bash League- BBL)

बीगबॅश लीग ही आयपीएल पाठोपाठ जगातील दुसरी श्रीमंत क्रिकेट लीग समजली जाते. २०११ साली सुरु झालेली ही लीग क्रिकेटजगतात अतिशय लोकप्रिय म्हणून ओळखली जाते. बीग बॅशचे आतापर्यंत ८ हंगाम झाले आहेत. याच लीगच्या धर्तीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिलांची विमेन्स बीग बॅश लीग सुरु केली.

थेट प्रक्षेपण हा बीग बॅश लीगचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. नेटवर्क टेनने २०१८पर्यंत या लीगचे हक्क १०० मिलीयन डाॅलरला विकत घेतले होते. त्यानंतर २०१९पासून फाॅक्स स्पोर्ट्स व सेवन नेटवर्ककडे या लीगचे प्रक्षेपणाचे हक्क आहेत. यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या सर्व स्पर्धांचे मिळून त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला १.१२ बीलियन डाॅलर मोजले आहेत. यात देशांर्तगत क्रिकेट, आंतरराष्ट्रीय सामने व बीग बॅश लीगचा समावेश

क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीग बॅश लीगमधील पहिल्या चार संघांना ८९००००० डाॅलर बक्षिसापोटी देते तर संघांना दरवर्षी ६००००० डाॅलर लिलावात खर्च करण्याची मुभा असते. सरासरी २८ हजार प्रेक्षक बीग बॅश लीगचे सामने पाहतात. एकूण १२ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक एका हंगामात लीगचा आनंद घेतात.

३)

नॅटवेस्ट टी२० ब्लास्ट (Natwest T20 Blast)

जगातील सर्वात जुनी व्यावसायिक टी२० लीग म्हणून नॅटवेस्ट टी२० ब्लास्टकडे पाहिले जाते. या स्पर्धेत इंग्लंडमधील तळागाळातील खेळाडूंना संधी देण्याचा मुख्य उद्देश ठेऊन या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

जवळपास १८ संघ या लीगमध्ये भाग घेतात. यात इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाशी संलग्न क्रिकेट संघ सहभागी होतात. या लीगची उलाढाल ४५ मिलीयन डाॅलरची असून २.६ मिलीयन डाॅलर बक्षीसांच्या रुपाने दिली जाते.

युकेच्या स्काय स्पोर्ट्सने टी२० ब्लास्टचे प्रक्षेपणाचे हक्क १२० मिलीयन डाॅलरला विकत घेतले आहेत. या लीगमधील सामने सरासरी २५ हजार प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहतात. एकूण १० लाख लोक हे सामने दरवर्षी पाहतात.

४)

पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League-PSL)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०१६मध्ये या लीगची सुरुवात केली. या लीगची पाकिस्तानमधील क्रीडाप्रेमी व आजी माजी खेळाडू आयपीएलशी तुलना करतात. परंतु ही लीग आयपीएलच्या तुलनेत बरीच मागे आहे.

गेली काही वर्ष पाकिस्तानमध्ये कोणताही संघ खेळण्यासाठी येत नसताना प्रेक्षकांना क्रिकेटमध्ये गुंतवूण ठेवण्याचे काम या लीगने २०१६पासून केले.

ही लीग पाकिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रिय असून तिची २०१७ची ब्रॅंड व्यॅल्यु ३००मिलीयन डाॅलर होती. पहिल्याच हंगामात या लीगला २.६ मिलीयन डाॅलरचा फायदा झाल्याचे पीसीबीने २०१६मध्ये घोषीत केले होते. हबीब बॅंक ही या स्पर्धेची मुख्य प्रायोजक असून त्यांनी २०१९मध्ये या लीगबरोबर तब्बल १४.३ मिलीयन डाॅलरचा करार तीन वर्षांसाठी केला आहे.

दरवर्षी पीसीबी या लीगच्या बक्षीसांवर १ मिलीयन डाॅलर खर्च करते. दरवर्षी प्रत्येक संघाला ७.२ लाख मिलीयन डाॅलर लिलावात खेळाडूंवर खर्च करण्यासाठी ही लीग देते. ३६ मिलीयन डाॅलरला या लीगने प्रक्षेपणाचे हक्क पीटीव्ही व जीओटिव्ही सुपरला देण्यात आले आहेत. या लीगमधील सामने सरासरी २५ हजार प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहतात. एकूण ९.५ लाख लोक हे सामने दरवर्षी पाहतात.

५)

कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League- CPL)

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने कॅरेबियन प्रीमियर लीगची सुरुवात २०१३साली केली. टी२० विश्वचषक दोन वेळा टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजमधील क्रिकेटचे वातावरण कॅरेबियन प्रीमियर लीगने जिवंत ठेवले. जगातील सर्व लीगमध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असतात. कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे त्यांना घरची हक्काची लीग मिळाली.

२०१८ साली या लीगची ब्रॅंड व्यॅल्यु १०२ मिलीयन डाॅलर होती. हिरो ही भारतीय टू व्हिलर क्षेत्रातील कंपनी यांची मुख्य टायटल प्रायोजक आहे. या लीगमधील ट्रीबॅंगो नाईट रायडर्स हा संघ कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक असलेल्या शाहरुख खानने विकत घेतला आहे.

दरवर्षी प्रत्येक संघाला ६ लाख मिलीयन डाॅलर लिलावात खेळाडूंवर खर्च करण्यासाठी ही लीग देते. या स्पर्धेत एकूण १ मिलीयन डाॅलरची बक्षीसे दिली जातात. या लीगमधील सामने सरासरी १३ हजार प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहतात. एकूण ६.५ लाख लोक हे सामने दरवर्षी पाहतात.

६)

बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League- BPL)

आशिया खंडातील आयपीएल व पीएसएल पाठोपाठ सर्वात लोकप्रिय लीग म्हणून याकडे पाहिले जाते. २०१२मध्ये या लीगचा पहिला हंगाम झाला. यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ३५० कोटी रुपयांचा करार गेम ऑन स्पोर्ट्स ग्रुपबरोबर केला होता.

या लीगमध्ये एकूण ७ संघ भाग घेतात. बीपीएलने २०१६-१७ हंगामात स्पोंन्सर्सकडून २.६ मिलीयन डाॅलर कमावले होते. त्यांनी या हंगामात सर्व मिळून एकूण ५१ मिलीयन डाॅलरची उलाढाल केली होती. जीटीव्ही व मासरंगा टीव्ही हे या लीगचे प्रक्षेपण करतात. यासाठी त्यांनी २०१७साली ७६ मिलीयन डाॅलर मोजले आहेत. या स्पर्धेत एकूण १.५ मिलीयन डाॅलरची बक्षीसे दिली जातात.या लीगमधील सामने सरासरी २४ हजार प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहतात. एकूण ९ लाख लोक हे सामने दरवर्षी पाहतात.